Monday, 8 June 2026

अनुसूचित जातीतील महिलांसाठी पिको फॉल मशीन योजनेसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ

जालना,दि.8(जिमाका): महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेमधून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरविण्याच्या योजनेअंतर्गत पिको फॉल मशीन वितरणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक लाभार्थींनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दि. 15 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद जालना यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिला लाभार्थींनी जिल्हा परिषद जालनाच्या www.zpjalna.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. संकेतस्थळावरील योजना/कार्यक्रम या पर्यायामध्ये राज्य शासनाच्या योजनांमध्ये सदर योजना उपलब्ध असून त्यावरील सविस्तर माहिती पाहता येणार आहे. लाभार्थींनी संबंधित योजनेवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरून तो सबमिट करावा. तसेच संकेतस्थळावरील ‘संविका’ या पर्यायामध्ये उपलब्ध असलेला पीडीएफ अर्ज व आवश्यक नमुन्यातील कागदपत्रे डाउनलोड करून ती भरावीत. अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडून संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (एकात्मिक बाल विकास प्रकल्प) कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 15 जून, 2026 असून, आवश्यक कागदपत्रांसह भरलेले अर्ज दि. 17 जून 2026 पर्यंत संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जिल्हा परिषद, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.


*****


No comments:

Post a Comment