जालना, दि.29 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने
राज्यातील गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ या
महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील अॅथलेटिक्स खेळाडूंसाठी
जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेद्वारे
जिल्हा प्रतिभा विकास केंद्र, निपुणता केंद्रासाठी पात्र खेळाडूंची निवड केली
जाणार असून इच्छुक व पात्र खेळाडूंनी 15 जुलै 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह
अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन लक्षवेध’ योजना राबविण्यात
येत आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये गुणवंत खेळाडूंची
निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून
देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी
होणाऱ्या निवड चाचणीत 25 वर्षांपर्यंतचे (31 डिसेंबर 2026 रोजी) मुले व मुली
सहभागी होऊ शकतात. इच्छुक खेळाडूंनी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास
प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र,
पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र (लागू
असल्यास) ही कागदपत्रे अर्जासोबत सादर करावीत.
निवड प्रक्रियेसाठी खेळाडू महाराष्ट्र
राज्याचे अधिवासी असणे आवश्यक असून त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तसेच
खेळाडूंची क्रीडा कामगिरीही महत्त्वाची राहणार आहे. AITA मधील टॉप-3 क्रमांक,
राष्ट्रीय क्रमवारीतील खेळाडू, राज्यस्तरीय पदक विजेते, SGFI, AFI, Khelo India National
किंवा इतर मान्यताप्राप्त स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीला प्राधान्य दिले जाणार
आहे. याशिवाय क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती (Fitness) चाचणीमध्ये पात्र ठरणे
आवश्यक राहील.
खेळाडूंनी शासन मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून दिलेले वैद्यकीय
फिटनेस प्रमाणपत्रही अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निवड चाचणी 17 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असून अर्ज 15 जुलै 2026
पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत,
सर्व्हे क्र. 488, जालना येथे प्रत्यक्ष सादर करावेत.
या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त पात्र
खेळाडूंनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी
नरेंद्र पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
जालना येथे किंवा क्रीडा मार्गदर्शक आशीष जोगदंड (मो. 8888364888) यांच्याशी
संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment