Monday, 15 June 2026

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा

 




 

जालना,दि.15(जिमाका): जालना जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापुर, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा, भोकरदन अशा एकुण 3 शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहेत.

 

आज दि.15 जुन,2026 रोजी जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापुर, भोकरदन येथे प्रवेशात्सव साजरा करण्यात आला.

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना येथील शाळेमधील प्रवेशित मुलींनी प्रवेशोत्सव निमित्त शालेय पुस्ताकांचे व मोबाईल टॅबचे वाटप करण्यात आले आहे.

 

सदर प्रवेशात्सवा दरम्यान विशेष अधिकारी (शा.नि.शा.),डॉ. अनिता राठोड, समाजकल्याण, स्नेहल मोदाळे, संदिप कांबळे, मुख्याध्यापिका, सुर्यकला गोसावी, अधिक्षका भावना चौधरी तसेच शासकीय निवासी शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.

-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment