जालना, दि.26 (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व
ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना राबवत असून उदयोजकांना
व सुशिक्षीत बेरोजगार यांना व नविन उद्योजकांना उद्योगासाठी मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पी. एम. विश्वकर्मा
योजना, मधुमक्षिकापालन योजना अशा योजना कार्यालयाकडे राबविल्या जात आहेत.
उद्योजकांनी सीएमईजीपी, पीएमईजीपी,
पी.एम विश्वकर्मा योजनेत ऑनलाईन अर्ज केल्यास व बँकेकडून कर्ज मंजूर व वाटप
झाल्यावर उदयोग उभारल्यावर शासनाकडून ग्रामीण भागासाठी 25 टक्के किंवा 35 टक्के
मार्जिन मनी अर्थसहाय्य दिले जाते तसेच शहरी भागासाठी 15 टक्के किंवा 25 टक्के अशी
मार्जिन मनी दिले जाते. तसेच शेतकऱ्यांना मधपेट्यांसाठी 50 टक्के अनुदान मिळते व
प्रशिक्षण दिले जाते.
या तीन योजनेतंर्गत जास्तीत-जास्त ऑनलाईन
अर्ज करुन कार्यलयाकडे मंडळामार्फत तयार केलेले ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी
या कार्यलयाकडे अर्ज करावा.
वरील दिलेल्या सर्व योजनांचा उदयोजकांनी
लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी
व ग्रामोदयोग मंडळाचे जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी भीमराव वाघमारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कार्यालयाचा पता- विशाल कॉर्नर मराठा पार्क
बिल्डींग दुसरा मजला छत्रपती संभाजी नगर रोड जालना संपर्क क्रमांक ग्रामोदयोग
अधिकारी भीमराव वाघमारे, मोबाईल नंबर- 9850327484 जेष्ठ पर्यवेक्षक विष्णु कायंदे मोबाईल
नंबर -8788730308 यांच्याशी संर्पक करावा.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment