जालना, दि.30 (जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बालविकास
विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री
राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18
वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक
कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा
पुरस्कार दिला जातो.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
2026 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. अर्ज (https://awards.gov.in) या
संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने दिनांक 31 जुलै 2026 रोजी पर्यंत स्वीकारले
जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा
कमी आहे व ज्या मुलांनी कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक
कार्य व शौर्य, अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे
प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार,
केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी
स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. राज्यातील अशा प्रकारच्या
जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment