जालना, दि.26 (जिमाका) : संपुर्ण जालना जिल्हयामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी 28
जुन रोजी राबविण्यात येणार आहे. पल्स
पोलिओ मोहिम अंतर्गत जालना जिल्हयातील 0 ते 5 वयोगटातील 2 लक्ष 56 हजार 875
बालकांना पोलिओची मात्रा 28 जुन रोजी देण्यांचे उद्दिष्ट असुन 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांनी
पल्स पोलिओ लस या दिवशी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील
आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी केले आहे.
पल्स
पोलिओ मोहिमेसाठी सुक्ष्मकृती आराखडयाचे
तयार करुन त्याप्रमाणे नियोजन केले आहे. ग्रामीण, शहरी भागामध्ये पल्स
पोलिओ बुथचे आयोजन करुन कर्मचारी, पर्यवेक्षक यांची डयुटी लावण्यांत आलेली आहे.
जिल्हयामध्ये पल्स पोलिओ मोहिम यशस्वी होण्यासाठी एकुण 5,547 मनुष्यबळाचा वापर
करण्यांत येणार आहे. अंगणवाडी, उपकेंद्र,
प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा
रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन, बस स्टॅंण्ड व
काही खाजगी रुग्णालय येथील पोलिओ बुथवर 0 ते
5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस सकाळी 8.00 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत
देण्यांत येईल. दो बुंद जिंदगी के. दोन
थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी.
आवाहन : 0 ते 5 वर्षे वयोगटातील
बालकांना पोलिओ लसची मात्रा सर्व पालकांनी द्यावी.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment