जालना,दि.15(जिमाका): हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले
मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.यांची उपकंपनी) जिल्हा कार्यालय जालना येथे सन-2026-27
या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजने अंतर्गत - 3 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून, बीज
भांडवल योजनेअंतर्गत 3 कर्ज प्रकरणांचे तर थेट कर्ज योजनेअंतर्गत-4 कर्ज प्रकरणांचे
उद्दिष्ट आहे. व एनएसएफडीसी योजनेअंतर्गत-2 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट व एनएसएफडीसी
सुक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत-1 आणि एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत
1 उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रांच्या
छायांकित प्रती 2 प्रतींसह सादर करावेत. यात जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन
कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड,कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसाय जागेचा पुरावा,2 पासपोर्ट
साईज फोटो,व्यवसायाचे लायसन्स इत्यादी. तरी हिंदु खाटीक समाजातील इच्छुक अर्जदाराने
सदरील योजनेचा लाभ घेण्याकरिता माहे ऑगस्ट-2026 अखेर पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर
करावा. तसेच कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहज हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ए.बी. बळी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment