Thursday, 23 July 2026
'चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; 4.96 लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ
' उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. 24 जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील 14 जिल्ह्यांतील 4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला.
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा
शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य
आजारांचा धोका लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात
जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून तो दिंडी मार्गावरील
14 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला.
या चौदा जिल्ह्यांत उपक्रम :सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना,
बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या
जिल्ह्यांतील 140 मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. या केंद्रांमधून
वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे
वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून
देण्यात आली.
3 हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर : या उपक्रमात 164 आरोग्य संस्थांनी सहभाग
घेतला. 7 हजार 538 स्वयंसेवक तसेच 11 हजार 331 डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी
विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवाकार्यात योगदान दिले. सेवेसाठी 10 हजार
टी-शर्ट आणि 3 हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा उपयोग चरणसेवेसाठी करण्यात आला.
तसेच 8 रथांद्वारे जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या या
उपक्रमातून तब्बल 4 लाख 96 हजारांहून अधिक
वारकऱ्यांना प्रत्यक्ष चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली.
दिंडीत अवयव दानावर जनजागृती : उपचारांबरोबरच आरोग्य जनजागृतीलाही विशेष महत्त्व
देण्यात आले. आरोग्य जनजागृती रथांद्वारे स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी,
संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान संदर्भात जनजागृती, निरोगी
जीवनशैली तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती
वारकऱ्यांपर्यंत आरोग्य रथाच्या माध्यमातून पोहोचविण्यात आली
प्रतिक्रिया : राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 4 लाख 96
हजारांपेक्षा अधिक वारकऱ्यांपर्यंत 'चरणसेवा' पोहोचविता आली, याचा आनंद आहे. या
उपक्रमाच्या यशामागे लोकसहभाग हीच सर्वात मोठी ताकद ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय
प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या
मोलाच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य यशस्वी झाले.
रामेश्वर नाईक
कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी
व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष
देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी 'एनएसओ'तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; 'संख्या मित्रां' मार्फत होणार माहिती संकलन जालना,दि.23 (जिमाका) : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) देशातील सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली विविध सर्वेक्षणे नियमितपणे राबवत आहे. या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, उद्योग, महागाई, शेती, स्थलांतर, कोळसा उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी संबंधीत विश्वासार्ह माहिती संकलित केली जाते. ही माहिती केंद्र व राज्य सरकारला विकास आराखडे तयार करण्यासाठी, विविध योजना आखण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. सन 2026-27 या कालावधीत NSO मार्फत विविध महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येणार असून त्यामध्ये सांख्यिकी अधिकारी, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सर्वेक्षण पर्यवेक्षक तसेच सर्वेक्षण गणक यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS): नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) हा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) अंतर्गत असलेल्या 'राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया'द्वारे (NSO) केला जाणारा एक देशव्यापी घरगुती सर्वेक्षण उपक्रम आहे. यातून भारतातील रोजगार आणि बेरोजगारीबाबत नियमित व व विश्वसनीय माहिती उपलब्ध होते. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO (कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल, तपासणीचे काम एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) : निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये आस्थापनांचे सर्वेक्षण. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण' (ASUSE) हे अर्थव्यवस्थेतील योगदान मोजण्यासाठी भारतातील असंघटित (अनौपचारिक) बिगर कृषी उद्योगांची माहिती संकलित करते. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल, तपासणीचे काम एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे. किंमत संकलन (ग्राहक किंमत निर्देशांक-CPI : शहरी / ग्रामीण / कृषी मजूर / ग्रामीण मजूर) निवडक बाजारपेठांमधील दुकानांमार्फत किमतींचे संकलन केले जाईल : ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) अंतर्गत, गणक एका निश्चित वेळापत्रकानुसार निवडक दुकाने, बाजारपेठा, सेवा प्रदाते आणि संस्थांकडून प्रत्यक्ष किरकोळ किमती गोळा करतात. वस्तूंची यादी आणि वजन हे नवीनतम उपलब्ध घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणावर आधारित असतात. सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) सर्वेक्षणाचे प्राथमिक काम करेल. तपासणीचे काम एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे. परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण (SAS) आणि अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (AIDIS) : सिच्युएशन असेसमेंट सर्व्हे' (SAS) भारतामधील शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती संकलित करतो. याद्वारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि उपभोग यांचे मूल्यांकन केले जाते. 'ऑल इंडिया डेट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे' (AIDIS) ग्रामीण आणि शहरी भागातील भारतीय कुटुंबांची मालमत्ता, देयता (कर्ज) आणि गुंतवणुकीचे स्वरूप याबाबत सर्वसमावेशक माहिती पुरवितात. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल; तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाईल. स्थलांतर तपशील सर्वेक्षण (MPS) - निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये सर्वेक्षण : स्थलांतर तपशील सर्वेक्षण' (MPS) हे भारतातील कुटुंबे आणि व्यक्तींच्या स्थलांतराच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे, जेणेकरून पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मितीस मदत होईल. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल,तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाईल. निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण : राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण (NHIS) चा उद्देश देशभरातील कौटुंबिक उत्पन्न आणि उत्पन्नाच्या वितरणाबाबत विश्वसनीय अंदाज तयार करणे हा आहे, ज्यामुळे भारतातील अधिकृत आकडेवारीतील दीर्घकाळापासून असलेली उणीव भरून काढली जाईल. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम ISO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे जाणार आहे. तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे. निवडक संस्थांमधील निगमित सेवा क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASISSE) : नोंदणीकृत सेवा क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASISSE) हे नोंदणीकृत सेवा क्षेत्राला समर्पित असलेले भारतातील पहिले वार्षिक सर्वेक्षण आहे. कॉर्पोरेट सेवा-क्षेत्रातील उपक्रमांवर एक व्यापक डेटाबेस विकसित करण्यासाठी हे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे (NSO) आयोजित केले जाते. डेटा संकलनाचे प्राथमिक काम SSO/JSO करणार आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राबविण्यात येणारी ही सर्वेक्षणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा वस्तुनिष्ठ आढावा देणारी आहेत. या सर्वेक्षणांतून मिळणारी विश्वासार्ह आकडेवारी शासनाला लोकाभिमुख योजना तयार करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील अचूक धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आधार ठरणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. -*-*-*-*-*-
जालना,दि.23
(जिमाका) : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(MoSPI) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) देशातील
सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली विविध सर्वेक्षणे नियमितपणे
राबवत आहे. या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, उद्योग, महागाई, शेती, स्थलांतर, कोळसा उत्पादन
आणि सेवा क्षेत्राशी संबंधीत विश्वासार्ह माहिती
संकलित केली जाते. ही माहिती केंद्र व राज्य सरकारला
विकास आराखडे तयार करण्यासाठी, विविध योजना आखण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय
घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
सन 2026-27 या कालावधीत
NSO मार्फत विविध महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येणार असून त्यामध्ये
सांख्यिकी अधिकारी, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सर्वेक्षण पर्यवेक्षक तसेच सर्वेक्षण
गणक यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यांची सविस्तर माहिती खालील
प्रमाणे आहे.
नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण
(PLFS): नियतकालिक
श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) हा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या
(MoSPI) अंतर्गत असलेल्या 'राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया'द्वारे (NSO) केला जाणारा
एक देशव्यापी घरगुती सर्वेक्षण उपक्रम आहे. यातून भारतातील रोजगार आणि बेरोजगारीबाबत
नियमित व व विश्वसनीय माहिती उपलब्ध होते. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO (कनिष्ठ सांख्यिकी
अधिकारी) आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल, तपासणीचे काम
एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाणार
आहे.
असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे
वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) : निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये आस्थापनांचे सर्वेक्षण.
असंघटित क्षेत्रातील
उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण' (ASUSE) हे अर्थव्यवस्थेतील योगदान मोजण्यासाठी भारतातील
असंघटित (अनौपचारिक) बिगर कृषी उद्योगांची माहिती संकलित करते. सर्वेक्षणाचे प्राथमिक
काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल, तपासणीचे काम एसएसओ
(वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे.
किंमत संकलन (ग्राहक किंमत निर्देशांक-CPI
: शहरी / ग्रामीण / कृषी मजूर / ग्रामीण मजूर) निवडक बाजारपेठांमधील दुकानांमार्फत
किमतींचे संकलन केले जाईल : ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) अंतर्गत, गणक एका निश्चित वेळापत्रकानुसार
निवडक दुकाने, बाजारपेठा, सेवा प्रदाते आणि संस्थांकडून प्रत्यक्ष किरकोळ किमती गोळा
करतात. वस्तूंची यादी आणि वजन हे नवीनतम उपलब्ध घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणावर आधारित
असतात. सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) सर्वेक्षणाचे प्राथमिक काम करेल. तपासणीचे काम
एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे.
परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण
(SAS) आणि अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (AIDIS) :
सिच्युएशन असेसमेंट सर्व्हे' (SAS) भारतामधील शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीबाबत
सविस्तर माहिती संकलित करतो. याद्वारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि उपभोग यांचे मूल्यांकन
केले जाते.
'ऑल इंडिया डेट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे'
(AIDIS) ग्रामीण आणि शहरी भागातील भारतीय कुटुंबांची मालमत्ता, देयता (कर्ज) आणि गुंतवणुकीचे
स्वरूप याबाबत सर्वसमावेशक माहिती पुरवितात. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण
गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल; तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक
यांच्याद्वारे केले जाईल.
स्थलांतर तपशील सर्वेक्षण
(MPS) - निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये सर्वेक्षण :
स्थलांतर तपशील सर्वेक्षण' (MPS) हे भारतातील कुटुंबे आणि व्यक्तींच्या स्थलांतराच्या
पद्धतींबाबत सविस्तर माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे, जेणेकरून
पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मितीस मदत होईल. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण
गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल,तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक
यांच्याद्वारे केले जाईल.
निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये
राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण :
राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण (NHIS) चा उद्देश देशभरातील कौटुंबिक
उत्पन्न आणि उत्पन्नाच्या
वितरणाबाबत विश्वसनीय अंदाज तयार करणे हा आहे, ज्यामुळे
भारतातील अधिकृत आकडेवारीतील दीर्घकाळापासून असलेली उणीव भरून काढली जाईल. सर्वेक्षणाचे
प्राथमिक काम ISO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे जाणार आहे. तर तपासणीचे
काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे.
निवडक संस्थांमधील निगमित सेवा
क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASISSE) :
नोंदणीकृत सेवा क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASISSE) हे नोंदणीकृत
सेवा क्षेत्राला समर्पित असलेले भारतातील पहिले वार्षिक सर्वेक्षण आहे. कॉर्पोरेट सेवा-क्षेत्रातील
उपक्रमांवर एक व्यापक डेटाबेस विकसित करण्यासाठी हे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे
(NSO) आयोजित केले जाते. डेटा संकलनाचे प्राथमिक काम SSO/JSO करणार आहेत.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राबविण्यात येणारी ही सर्वेक्षणे
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा वस्तुनिष्ठ आढावा देणारी आहेत. या सर्वेक्षणांतून
मिळणारी विश्वासार्ह आकडेवारी शासनाला लोकाभिमुख योजना तयार करण्यासाठी, विकासाला चालना
देण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील अचूक धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आधार ठरणार
आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना योग्य व अचूक माहिती देऊन
सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार; अर्ज करण्याचे आवाहन
जालना, दि.23 (जिमाका) : विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी तसेच त्यांच्या पाल्यांना सन 2025-26 या वर्षासाठी एकरकमी 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत ‘विशेष
गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक
कागदपत्रांसह अर्ज 15 सप्टेंबर
2026 पर्यंत
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
जालना येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या
पुरस्कारासाठी शैक्षणिक, क्रीडा, कला, सामाजिक कार्य, उद्योग, पर्यावरण तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विचार करण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील पात्रता : इयत्ता दहावीमध्ये किमान 90 टक्के व बारावीमध्ये किमान 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेले माजी सैनिक किंवा वीरपत्नींचे पाल्य पात्र राहतील. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविलेला किंवा IIT, IIM, AIIMS यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील पात्रता : राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य अथवा कांस्यपदक प्राप्त केलेले खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पात्र राहतील. संबंधित क्रीडा प्रमाणपत्रे Indian Olympic
Association, Sports Authority of India किंवा संबंधित National
Federation यांच्याकडून
प्रमाणित असणे आवश्यक
आहे.
कला व सांस्कृतिक क्षेत्र : साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य तसेच इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार अथवा उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींनाही या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल.
इतर क्षेत्रांतील पात्रता : पूर, भूकंप, वादळ, आग, दरोडा किंवा अपघात यांसारख्या नैसर्गिक अथवा आपत्तीजन्य परिस्थितीत बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्ती, यशस्वी उद्योजक तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात पुरस्कार प्राप्त व्यक्ती देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्जासोबत
संबंधित कामगिरीचे पुरावे,
पुरस्कारांची प्रमाणपत्रे, वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची कात्रणे, छायाचित्रे तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांचे
पाल्य यांनी आपले अर्ज 15 सप्टेंबर
2026 रोजी
किंवा त्यापूर्वी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, जालना येथे
सादर करून या विशेष गौरव पुरस्कार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयाने केले आहे.
-*-*-*-*-*-*-
महात्मा जोतीराव फुले द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागात विविध उपक्रमांचे आयोजन पशुपालकांसाठी जंतनाशक, वंध्यत्व निवारण शिबिरे व तांत्रिक मार्गदर्शन चर्चासत्रांचे वेळापत्रक जाहीर
जालना, दि.23 (जिमाका) : महान समाजसुधारक महात्मा जोतीराव
फुले यांच्या जयंतीला 2027 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
यांच्या निर्देशानुसार वर्ष 2027 हे 'महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष' म्हणून
साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन
विभागामार्फत राज्यभरात विविध शेतकरी-हितोपयोगी उपक्रम राबवले जाणार असून, याबाबतचे
सविस्तर वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागातर्फे या उपक्रमातंर्गत जुलै 2026 ते सप्टेंबर
2026 या कालावधीत प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जुलै
2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान गायी व म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी विशेष तपासणी
व उपचार शिबिरे घेतली जातील. मार्च 2027 ते एप्रिल 2027 या काळात पशुसंवर्धनविषयक आधुनिक
तांत्रिक माहिती व मार्गदर्शनासाठी चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल.
उपक्रमांचे वैशिष्ट्ये व महत्व :
·
जंतनिर्मूलन मोहीम : जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे
वजन घटणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे व विविध आजारांमुळे पशुधन मृत्युमुखी
पडण्याचा धोका असतो. यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांतील औषधांचा वापर करून प्रत्येक
गावात जंतनाशक शिबिरांद्वारे नियमित जंतनिर्मूलन केले जाणार आहे.
·
वंध्यत्व निवारण शिबिरे : दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी जनावरांचे
नियमित वेत होणे आवश्यक असते. जनावरांमध्ये वंध्यत्व आल्यास प्रतिवर्षी वेत न मिळाल्याने
संगोपनाचा खर्च वाढून पशुपालक तोट्यात जातात. यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात शिबिरांचे
आयोजन करून गायी व म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार केले जातील.
·
तांत्रिक चर्चासत्रे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन : पशुपालकांना आधुनिक
पशुसंवर्धनाची माहिती मिळावी यासाठी कृषी
विज्ञान केंद्र आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना निमंत्रित
करून प्रत्येक गावात तांत्रिक चर्चासत्रे
आयोजित केली जातील.
पशुसंवर्धन
विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरवण्यात आलेल्या औषधांमधून हे उपक्रम राबवले
जाणार असून, सर्व प्रादेशिक कार्यालयांना या उपक्रमांचा मासिक अहवाल सादर करण्याचे
निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. या उपक्रमांमुळे राज्यातील पशुपालकांना मोठा
दिलासा मिळणार असून पशुधनाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
महान समाजसुधारक महात्मा
जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभरात
विशेष उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे, जनावरांचे
आरोग्य सुधारणे व दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
जंतनिर्मूलन, वंध्यत्व निवारण व तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक
गावातील पशुधनापर्यंत पोहोचण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. राज्यातील सर्व पशुपालकांनी या
शिबिरांचा व उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त,डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
·
पशुवैद्यकीय सेवांसाठी कॉल करा 1962, व्हॉट्सअप चॅटबॉट सेवेसाठी 9063142299
-*-*-*-*-*-*-
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन
जालना,दि.23 (जिमाका)
: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची
जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी त्यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत
हदगल. उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, नायब तहसिलदार तुषार निकम, विक्रांत मोंढे, सतीश
तायडे, किशोर तायडे, नीलम लुनावत, पी.डी. शिंदे, संतोष पगार, संतोषी सुर्यवंशी,
सहाय्यक महसुल अधिकारी संध्या सुखदेवे, अनिरुध्द झुंबड, दिपाली राऊत (वानखडे),
शिल्पा मगरे, संपदा कुलकर्णी, स्वाती राठोड, श्री. सानप, अनंत जुन्नारे, विठ्ठल बोरकर, अतुल केदार,वैशाली नवले, सविता
भोकरे, कुंता पठाडे, सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध
कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-*-


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
