Thursday, 13 August 2026

केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडे पंतप्रधान शिष्यावृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 


            जालना,दि.13 (जिमाका) :  जालना जिल्हयातील माजी सैनिक/सैनिक विधवा/अवलंबित यांना कळविण्यात येते की, शैक्षणीक वर्ष 2026-27 या शैक्षणीक वर्षासाठी पंतप्रधान शिष्यावृत्ती मिळणेसाठीची प्रकरणे ही www.ksb.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे सादर करणेची कार्यवाही सुरु झालेली आहे. इयत्ता 12 वी, किंवा पदवीका (Diploma) मध्ये 60% टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी दि. 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेतलेल्या (कोर्सेची यादी online पहावी )

            Online भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी व उर्वरित  कागदपत्रांची छांयाकीत प्रत काढुन जिल्हा  सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावी. सदर Online फॉर्म भरण्याची  कार्यवाही सुरु असुन  शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026 अशी आहे. सुधारित जोडपत्र 1,2 व 3 (2026-2027) आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती के.एस.बी. च्या संकेतस्थळावर (www.ksb.gov.in) उपलब्द आहे किंवा अधिक माहितीस्तव या कार्यालयात संपर्क करावा. तरी पात्र व इच्छुक माजी सैनकिांच्या पाल्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment