Thursday, 13 August 2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना,दि.13 (जिमाका) : सन 2026-27  करीता राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शासनस्तरावरुन प्राप्त झाले असून पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज दि. 12 ऑगस्ट,2026 रोजी पासून उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हयातील व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर भेट देऊन परिपूर्ण अर्ज सादर करावे व त्याची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण, जालना या कार्यालयात सादर करावी असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment