जालना,दि.13 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
छत्रपती संभाजीनगर येथून जालना येथे सकाळी 11.45 वाजता आगमन व रेशीम कोष बाजारपेठ,
नवीन इमारत, सिरसरवाडी रोड, जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण
सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता एमआयडीसी फेस वन छत्रपती
संभाजीनगर चौफुली-जालनाकडे प्रयाण करतील. दुपारी 12.15 वाजता एमआयडीसी फेस वन
छत्रपती संभाजीनगर चौफुली-जालना येथे आगमन व भारतीय जनता पार्टी, जालना जिल्हा
कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर 01.30 वाजता जालना
येथुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment