जालना,दि.10(जिमाका) : "आंतरराष्ट्रीय युवा दिन" म्हणून 12
ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो, यावर्षी युनायटेड संघटनेचे युवा दिना विषयीचे
"Different Contexts, Common Aspirations." "वेगवेगळे संदर्भ समान आकांक्षा"
असे घोषवाक्य आहे याचा अर्थ असा की, वेगवेगळ्या परिस्थिती किंवा पार्श्वभूमी असतानाही
लोकांच्या मनातल्या इच्छा, स्वप्ने किंवा ध्येय एकसारखीच असतात.
12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून
दरवर्षी आपण साजरा करतो. युवा वर्ग हा अति संवेदनशिल असून युवा पिढीमध्ये एचआयव्ही
/ एड्स, गुप्तरोग इत्यादी आजाराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. याअनुषंगाने जिल्हास्तरावर
दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता रेड रन स्पर्धा व जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्न
मंजूषा स्पर्धा तर दि. 12 ऑगस्ट, 2026 रोजी जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात
आले आहे. तसेच दि. 12 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधी मध्ये रेड रिबन क्लब स्थापन असलेल्या
महाविद्यालयामध्ये प्रभात फेरी, सोशल मिडीया मोहिम नॅको, रिल मेकिंग स्पर्धा, सोशल
मिडीया पोस्ट स्पर्धा तसेच विविध महाविद्यालयामध्ये एचआयव्ही/एड्स विषयी आयसीटीसी समुपदेशकामार्फत
एचआयव्ही/एड्स विषयी मुलभूत माहिती, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी,
एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचार इत्यादी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
तरी या कार्याक्रमांमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना
सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment