जालना,दि.13 (जिमाका): राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना
जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.
पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार,
दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर
येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.00 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती
संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन
कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर सकाळी 11.00 वाजता रेशीम कोष बाजारपेठ, नवीन इमारत, सिरसरवाडी
रोड, जालना येथे रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित
राहतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, रांजणी,राणी उंचेगाव, पिंपरखेड बु.
दुधना काळेगाव, हसनाबाद, शहागड, वाकुळणी येथील
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा
परिष्ज्ञद, लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता जालना येथून
छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता महात्मा फुले चौक औंरगापुरा छत्रपती संभाजीनगर
येथे आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील.
सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी
6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.
शनिवार,
दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय
ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने
परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment