जालना,दि.13 (जिमाका) : दि. 17 ते 20 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्यामधील तालुक्यातील पंचायत समिती
कर्यालय येथे "जागेवर निवड संधी" प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन.नोकरीच्या
शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या,
कारखाने,उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचे कडील रोजगाराच्या संधी आणि मार्गदर्शन
उपलब्ध करण्याच्या उद्देशानेरोजगार स्वयंरोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू
करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
मॉडेल करिअर सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत दि. 17 ते 20 ऑगस्ट, 2026
रोजी जालना जिल्ह्यामधील तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय येथे "जागेवर
निवड संधी" प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन सकाळी 11 ते 3 दरम्यान करण्यात आले
आहे.
या करिता कॅपस्टॉन फॅसीलिटीज लिमीटेड
संस्था, हैद्राबाद यांचे 8 वी पास, 10 वी पास, 12 वी पास या करिता सुरक्षा जवान चे
500 पदे, तसेच कोणताही पदविधर करिता सेक्युरिटी सुपरवायजर चे 100 पदे अशी एकूण 600
रिक्तपदे प्राप्त झाली असून या करीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या
उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार
आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी य संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी
विभागाच्या www.mahaswayam.gov.in त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in
या वेबसाईटला भेट द्यावी.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment