Monday, 10 August 2026

प्लेसमेंट ड्राईव्हचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

 


  जालना,दि.10 (जिमाका) : नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रोजगार स्वयंरोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचेमार्फत बुधवार, दि. 12 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 11 ते दूपारी 2 दरम्यान जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

  या प्लेसमेंट ड्राईव्हकरिता आयोनेक्स व्हेचर्स प्रा. लि.जालना यांचे बी.कॉम पदवी उत्तीर्ण करिता टेली कॉलरचे 10 पदे, तसेच बी.बी.ए. / एम.बी.ए. मार्केटिंग करिता उत्तीर्ण विक्री समन्वयकचे 2 पदे, एम.बी.ए. उत्तीर्ण करिता विक्री अधिकारीचे 3 पदे, आणि बी.कॉम. पदवी उत्तीर्ण करिता अकाउंटंटचे 1 पद त्याचप्रमाणे भारत फायन्ससियल इन्क्लुजन प्रा. लि.जालना यांची दहावी उत्तीर्ण करिता फिल्ड असिस्टंट ट्रेनी ची 20 पदे, तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण करिता ब्रांच व्यवस्थापक आणि युनिट व्यवस्थापकची 5 पदे अशी एकूण 33 रिक्त पदे प्राप्त झाली असून, याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.

जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी. तसेच होम पेजवरील नोकरी साधक ( Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर जागेवर निवड संधी (2025-26) प्लेसमेंट ड्राईव्ह 4 या बटनावर क्लिक करून जालना जिल्हाची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी Apply करावा. मुलाखतीसाठी बायोडाटा किमान दोन प्रती सोबत ठेवून बुधवार, दि. 12 ऑगस्ट, 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला, जालना येथे उपस्थित रहावे असे आवाहन प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विशाल येवले यांनी केले आ

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment