जालना, दि.6 (जिमाका) : राष्ट्रीय
कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या
इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य
स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर
स्किल कान्सिल तसेच औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हा, विभाग आणि राज्य
स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची तसेच जागतिक स्तरावरील वर्ल्डस्किल
कॉम्पिटिशन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते.
ही स्पर्धा व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेच्या क्षेत्रातील जगातील सर्वात
मोठी स्पर्धा मानली जाते. 23 वर्षांखालील युवक-युवतींना कौशल्य सादर करण्याची ही
स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच असते, हे विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये आपले ज्ञान,
गुणवत्ता व प्राविण्य सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.
इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 करिता वयोमर्यादा हा
एकमेव पात्रतेचा निकष असून 56 कौशल्य क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1
जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्योरिटी,
इंडस्ट्री 4.0, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टम इंटेग्रशन या टिम स्किल गटातील
स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक
आहे. तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप
गार्डनिंग या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2006
किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था
(ITI), कौशल्य प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक,
उद्योग-आस्थापना तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांनी पात्र युवक-युवतींमध्ये या
स्पर्धेबाबत जनजागृती करून इंडियास्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 स्पर्धेसाठी इच्छुक
उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन
ऑनलाइन नोंदणी करावी. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment