जालना,दि.7(जिमाका) : महालेखापाल, नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय,
जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 11 ऑगस्ट,2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सामाजिक
न्यायभवन, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पेन्शन
अदालत व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
पेन्शन
अदालत तसेच कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील निवृत्तीवेतन प्रकरणांविषयी
अडचणी जाणुन घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची
निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा वापस करण्यात आली आहेत यांच्याही अडचणी
जाणुन घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी किंवा त्यांचे
प्रतिनिधी तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची प्रकरणे प्रलंबीत असतील असे निवृत्तीवेतनधारकांनी
या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment