जालना,दि.6 (जिमाका) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या
जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत
संचालित शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया
सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन
संकेतस्थळावर दि. 7 ऑगस्ट ते दि. 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी केले आहे.
प्रवेश
प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज दाखल झाल्यानंतर
दि. 1 सप्टेंबर ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
त्यानंतर दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.
पहिल्या
निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 18 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची
मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार दुसरी निवड
यादी दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी
दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे वेळापत्रक जाहीर करण्यात
आले आहे.
ही
प्रवेश प्रक्रिया बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी तसेच
व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
इतर मागास बहुजन
कल्याण विभागाने पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ
घ्यावा. तसेच जालना महानगरपालिका हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरावरील परिसरातील महाविद्यालयांमध्ये
प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच वसतिगृह योजनेसाठी
अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment