जालना,दि.14 (जिमाका) : राज्यात दि. 9 ऑगस्ट ते दि. 17 ऑगस्ट 2026 कालावधीत “हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत” विविध कार्यक्रमांचे
व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी जालना यांनी
‘हर घर तिरंगा’ अभियानांतंर्गत जालना शहरात सायकल रॅलीचे 15 ऑगस्ट, 2026 रोजी
सकाळी 8.00 वाजता आयोजन केले आहे.
या सायकल रॅलीचे जिल्हाधिकारी कार्यालय
येथून सकाळी 8.45 वाजता अंबड चौफुली-नुतन वसाहत-रेल्वे स्टेशन-चमन-शनि
मंदिर-छत्रपती संभाजी महाराज पुतळा - मोतीबाग - जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे
आयोजित करण्यात आली आहे. या सायकल रॅलीत जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी
सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment