जालना, दि.5 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष
2026-27 साठी फक्त मागील वर्षी (2025-26) स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी
नूतनीकरण (Renewal) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी
आपले Renewal (नूतनीकरण) अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अनिवार्यपणे ऑनलाईन सादर
करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यास अर्ज सादर
करता येणार नाही किंवा अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
अर्ज भरताना
कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी संबंधित सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयाशी संपर्क साधावा. विहित मुदतीत विद्यार्थ्यांनी
आपला Renewal (नूतनीकरण) अर्ज सादर केला नाही, तर संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेचा
लाभ घेण्यास इच्छुक नाही, असे गृहीत धरून त्यांना
स्वाधार योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी कोणतीही विलंब न
करता लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. अंतिम
मुदतीची वाट न पाहता तात्काळ hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपले नूतनीकरण
(Renewal) अर्ज भरावेत व स्वाधार योजनेचा लाभ कायम ठेवावा. असे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
जालना यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment