जालना,दि.10(जिमाका) : आगामी 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिन देशभरात विविध उपक्रमांनी
साजरा करण्यात येणार आहे. भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सहन कराव्या
लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला त्या
काळातील इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट, 2026 या
कालावधीत ‘घराघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने जिल्ह्यात शालेय-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद,
चर्चासत्राचे, व प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंदे मातरम या
गितास 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे
कार्यवाही करण्यात येणार आहे. देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम, घरोघरी तिरंगा अभियान
तसेच वंदे मातरम या गीतास 150 पुर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शन आयोजन करणे, तिरंगा
रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, सेल्फी विथ तिरंगा रांगोळी
स्पर्धा आयोजित केली जाणार आहेत. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे,
दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याच्या माध्यमातून नागरिकांना त्या काळातील
परिस्थितीची माहिती करून देण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक
संस्थांमध्ये निबंध स्पर्धा व चर्चासत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फाळणीचा
इतिहास, त्याचे सामाजिक परिणाम आणि त्यातून मिळणारे धडे याबाबत मार्गदर्शन केले
जाणार आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment