Tuesday, 18 August 2026

डाक जीवन विमा (PLI) व ग्रामीण डाक जीवन विमा (IULLI) चा विस्तार करण्यासाठी डाक विभागाकडून 'इतर विभागीय कर्मचारी’ नवीन एजंट श्रेणीची सुरुवात

 

   

 

जालना,दि.18(जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये डाक जीवन विमा (PLI) तसेच सामील एक विमा (RPLI) यांचा प्रसार व व्याप्ती अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने चार विभागाने इतर विभागीय कर्मचारी (Other Departmental Employee ODEO ही नवीन एजेंट वेणी सुरु केली आहे. ही योजना 1 जुलै 2026 पासून प्रभावी झाली आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्‌येः

पात्रताः डाक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, वेतन मॅट्रिक्समधील लेव्हल 8 पर्यंतच्या पदावर कार्यरत असलेला कोणताही का अथवा राज्य शासनाचा कर्मचारी ODE म्हणून नोंदणी करण्यास पात्र असेल.

नियुक्तीचे स्वरूपः ODE म्हणून कार्य करणे पूर्णतः ऐच्छिक असेल. तसेच, ODE आणि डाक विभाग यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोक्ता-कर्मचारी संबंध निर्माण होणार नाहीत.

कामकाजाची वेळः विमा व्यवसाय मिळविण्याचे कार्य संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या अधिकृत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त करणे आवश्यक आहे.

आवश्यक पूर्वअटी: अर्जदाराने आपल्या मूळ विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) अथवा आवश्यक परवानगी प्राप्त करणे बंधनकारक आहे.

प्रशासकीय मार्गदर्शनः ODE यांना विकास अधिकारी (PLI) यांच्याशी संलग्न करण्यात येईल. विकास अधिकारी त्यांना आवश्यक मार्गदर्शन, परिचयात्मक माहिती, प्रशिक्षण तसेच कामकाजासाठी आवश्यक कार्यात्मक सहाय्य प्रदान करतील.

प्रोत्साहनाची रचना: ODE यांना व्यवसाय मिळविण्यासाठी तसेच नूतनीकरणासाठी खालीलप्रमाणे इन्सेंटिव्ह देण्यात येईल.

PLI  व्यवसाय प्राप्ती इन्सेंटिव्हः विमा पॉलिसीचा प्रकार व प्रीमियम भरण्याच्या कालावधीनुसार प्रथम वर्षाच्या प्रीमियमच्या 4% से 20% पर्यंत.RPLI व्यवसाय प्राप्ती इन्सेंटिव्हः सर्व प्रकारच्या RPLI पॉलिसींवर प्रथम वर्षाच्या व्यवसाय प्राप्ती प्रीमियमच्या 10%.नूतनीकरण (म्हणजे दुसऱ्या वर्षापासून) इन्सेंटिव्हः PLI पॉलिसींवर 1% आणि RPLI पॉलिसींवर 2.5%.

सेवानिवृत्तीनंतरचे लाभः ODE म्हणून कार्यरत असताना प्राप्त केलेल्या व्यवसायावर सेवानिवृत्तीनंतरही नूतनीकरण इन्सेंटिव्ह मिळवत राहता येईल. यासाठी संबंधित ODE यांनी सेवानिवृत्तीच्या तीन महिन्यांच्या आत फील्ड ऑफिसर (FO) म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावाःपात्र शासकीय कर्मचारी विहित नमुन्यातील अर्जासोबत कार्यालयीन ओळखपत्राची साक्षांकित प्रत, PAN, पत्त्याचा पुरावा तसेच आपल्या मूळ विभागाकडून प्राप्त आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) जोडून प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर डाक विभाग 431 001 यांच्या कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी संपर्कः मोबाईल क्र.: 8484954808 संदीप महाजन प्रवर अधीक्षक डाकघर

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment