जालना दि.26 (जिमाका) : भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांचे दि. 18 मे,2026 रोजीच्या
पत्रान्वये महाराष्ट्र विधान परिषदेची व्दिवार्षिक
निवडणुक ची आदर्श आचारसंहिता दि. 18 मे,2026 पासुन लागू केलेली असून ती विधान परिषदेची
व्दिवार्षिक निवडणुक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत म्हणजे दि.25 जुन, 2026 पर्यंत
लागू राहणार असल्याचे निर्देशित केलेले आहे.
आचारसंहिता कालावधीत निवडणुकीचे वेळापत्रक घोषीत केल्याच्या दिनांकापासून
ते निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत या कार्यालयास प्रत्येक महिन्याचा पहिल्या
सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन शासन परिपत्रक दि. 26 सप्टेंबर
2012 मधील परिच्छेद क्र. 5.7 च्या तरतुदीनुसार आयोजित करण्यातयेणार नाही.
No comments:
Post a Comment