जालना
दि.6, (जिमाका): क्रीडा व युवक
सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत मिशन लक्षवेध योजना ही धोरणात्मक योजना
राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत आर्चरी व ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकाराकरीता जिल्हा
प्रतिभा विकास केंद्र स्थापन करणे प्रस्तावित आहे. हे केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने खेळाडू
निवड चाचणीचे आयोजन करुन तुर्तास ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकाराची खेळाडू निवड चाचणी
आयोजित करण्यात येणार आहे.
खेळाडू
निवड चाचणीकरीता निकष खालीलप्रमाणे
ॲथलेटिक्स जिल्हा प्रतिभा विकास केंद्र निपुणता केंद्रस्तरावरील
खेळाडू निकष
वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले/मुली (वर्षाच्या
31 डिसेंबर 2026 रोजी), जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,
आधार कार्ड, मागील 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 3
फोटो, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र. महाराष्ट्र राज्यातील
खेळाडू असणे आवश्यक (अधिवास प्रमाणपत्र), क्रीडा कामगिरी एआयटीसए मध्ये टॉप 3 रँक प्लेअर
असावा, नॅशनल रॅकींग प्लेअर असावा, राज्यस्तरातील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय
स्तरावरील सहभागी खेळाडू, गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन
क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती फिटनेस चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक. शासन मान्यताप्राप्त
डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
अनिवार्य.
सर्व पात्र
खेळाडूंनी दि. 15 मे 2026 रोजी पर्यंत अर्ज
व कागदपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय येथे कार्यालयीन
वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-
नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास
मोठी मदत होणार आहे.एकूणच, जायका आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील ही प्रस्तावित भागीदारी
आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे ही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment