जालना दि.1 (जिमाका): राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते जालना शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन चौपाटीचे सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी नागरिकांसाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आणि बैठकीची उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यावेळी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

.jpeg)
No comments:
Post a Comment