जालना, दि.4 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांर्तत सहायक
आयुक्त, समाजकल्याण यांच्या अधिनस्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय
निवासी शाळा, बदनापूर येथील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना प्रवर्ग एसी 80 टक्के, प्रवर्ग एसटी 10 टक्के, प्रवर्ग विजेएनटी 5
टक्के, प्रवर्ग एसबीसी 2 टक्के, पीएच 3 टक्के याप्रमाणे रिक्त जागा आरक्षित आहेत.
वरीलप्रमाणे इयत्ता 6 वी साठी 40 जागा व इयत्ता 7 वी ते 10 वी वर्गामध्ये रिकत असलेल्या संवर्गानुसार
रिक्त जागेसाठी प्रवेश पात्र व 6 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व
दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.
20 जून 2026 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन द्यावेत त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात
येणार नाही. जालना जिल्ह्यातील वरील प्रवर्गातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी
प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहज सहायक आयुक्त राजु एडके तसेच मुख्याध्यापक डॉ. दिलीप
गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment