जालना दि.7,(जिमाका): जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना अणि विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड जालना यांचे संयुक्त विद्यामाने दिनांक 9 मे, 2026 शनिवार रोजी विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड बोरखेडी,
सिंदखेड राजा रोड जालना येथे
सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (प्लेसमेंट ड्राईव्ह) “जागेवर
निवड संधी” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी 27 रिक्तपदे उपलब्ध आहेत.
रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित
महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळाव्याचे आयोजीत करण्यात येत आहे.
या मेळाव्यात विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड जालना यांचे नियुक्ते उमेदवारांची निवड
करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 27 रिक्तपदे 1) आयटीआय फिटर 1 पद 2) आयटीआय इलेक्ट्रिशन1
पद 3) आय टी आय मशीनिस्ट 1 पद 4) वेअर हाऊस सहाय्यक 02
पदे 5) अकाउंट असिस्टंट 2 पदे 6) ऑफिस एच. आर. 1 पदे 7)
लोडिंग ड्रायव्हर 10 पदे 8) सुपरवायझर 3 पदे 9)
डाटा एन्ट्री ऑपरेटर 5 पदे इत्यादी, 18 ते 35 वयोगटातील पात्रता धारक उमेदवारां साठी पदे उपलब्ध झालेली आहेत, सदर पदासाठी आयटीआय, बी. कॉम पदवीधर, एमबीए, कोणत्याही शाखेतील पदवी त्याच
प्रमाणे ड्रायव्हर पदासाठी
अनुभव धारक उमेदवारा यांच्यासाठी ही
जागेवर निवड संधी आयोजित करण्यात येत आहे.
तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा.
मुलाखती साठी बायोडाटा
एक प्रत सोबत ठेवावी. प्रत्यक्ष
मुलाखतीसाठी विक्रम
टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड बोरखेडी, सिंदखेड राजा रोड जालना सकाळी 9
वाजता
उपस्थित राहावे. असे
आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता, जालना यांनी
केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment