जालना दि.27 (जिमाका) : प्रजासत्ताक दिन दि. 26 जानेवारी, 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म
पुरस्काराकरिता (पद्मश्री, पद्म भूषण, पद्मविभूषण) शिफारशी केंद्र शासनामार्फत
नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी
पुरस्कारांपैकी एक असून ते अतिशय प्रतिष्ठेचे आहेत. याबाबतचे अधिनियम आणि नियम
केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या
www.padmaawards.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यातील पद्म
पुरस्कारासाठी पात्र व इच्छुक मान्यवरांची वैयक्तीकरीत्या ऑनलाईन नामांकन पोर्टलवर
दि. 31 जुलै 2026 पर्यंत सादर करण्यासाठी
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, यांनी आवाहन केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment