Tuesday, 23 September 2025

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि.23 (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय अंतर्गत मुख्य कंपनी व 13 उपकंपनी अंतर्गत लघु उद्योग व्यवसायकरीता व शिक्षणाकरीता कर्ज पुरवठा केल्या जातो. सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजना  पेट कर्ज योजना मर्यादा 1 लाख, 20 टक्के बीज भांडवल योजना मर्यादा 5 लाख रुपये, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 15 लाख रुपये, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 20 लाख रुपये, गट कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 20 लाख रुपये, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी पात्र लाभार्थ्यांनी  जिल्हा व्यवस्थापक  महाराष्ट्र राज्य इतर  मागासवर्गीय  वित्त आणि विकास महामंडळ  मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जालना येथे संपर्क क्रमांक 02482 -223420 यावर तसेच www.msobcfdc.org संपर्क करण्याचे तसेच योजनेच्या  लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.एम. राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment