जालना, दि.26(जिमाका):
जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान
झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री
मंगलप्रभात लोढा यांनी आज बदनापूर तालूक्यातील
शेलगाव या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. यावेळी श्री. लोढा
म्हणाले की, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीनुसार योग्य पंचनामे करावे. अतिवृष्टीने
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत देण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभे असुन, त्यांनी काळजी करू नये. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे
पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. लोढा
यांनी यावेळी सांगितले.
यावेळी
आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार, श्री. हेमंत तायडे, सरपंच,
मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह शेलगाव येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment