जालना, दि.22 (जिमाका): अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर,
मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून
येतात. त्याकरीता जिल्ह्यात अंमली पदार्थांचा प्रतिबंधासाठी सर्व
विभागानी सतर्क राहून दोषींवर कायदेशिर कारवाई करण्याच्या सूचनाअपर जिल्हाधिकारी
रिता मैत्रेवार यांनी दिलया.
अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध
घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ
विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी
पोलीस निरिक्षक एस.एम. इंगेवाड, अन्न व औषध प्रशासनचे औषध सहायक आयुक्त जी. द.
जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
निरिक्षक प्रविण ठाकूर, हेड पोस्ट ऑफिसचे अमोल
बेंडे, जिल्हा कृषि अधिक्षक विभागाच्या व्ही.बी.भोर, उपविभागीय अधिकारी जालना नायब
तहसिलदार शैलेश राजमाने, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती मैत्रेवार म्हणाल्या की,
औषध विक्रेत्यांकडून अनेकदा बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी
औषधे विक्री केली जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री
होता कामा नये. याबाबत मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. टपाल विभागाने
पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे, याची तपासणी
करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल द्यावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अवैध अमंली
पदार्थाचे उत्पादन निर्मितीचे होण्याची शक्यता असल्याने अशा कारखान्यांची वेळोवेळी
तपासणी करण्यात यावी.
आजची युवा पिढी
अंमली पदार्थाच्या आहारी जावू नये यासाठी बालवयातच त्याच्या दुष्परिणामाची माहिती त्यांना
झाली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयातून विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये व्यापक जनजागृतीच्या
माध्यमातून अंमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगण्यात यावे. अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, टपालाच्या
माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही तसेच जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची
सर्व संबंधीत विभागानी दक्षता घ्यावी. व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय ठेवून, दाखल
झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे, याबाबतची माहिती घ्यावी.
शाळा
आणि महाविद्यालयापुरतेच मर्यादित न राहता गावपातळीवर देखील अंमली पदार्थाच्या सेवनाच्या
दुष्परिणामाची माहिती द्यावी. शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायतस्तरावर व्यापक जनजागृती
करण्याचे निर्देशही यावेळी श्रीमती मैत्रेवार यांनी दिले. अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी
आढावा घेण्यात आला.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment