जालना
दि.17 (जिमाका) :- मराठवाडा
ही संताची भूमि आहे. संत विचार सरणीतुन आपण माणुसकी जोपासली आहे. आपण देश व
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आहोत. आताच्या काळात वंचितांचा व
सामान्यांचा वाणी व वाली होवून लढले पाहिजे. तरी मराठवाड्यातील सामाजिक सलोख्याची वीण
विसकटू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण
व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा
मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.
प्रारंभी टाऊन हॉल परिसरात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला अनन्य साधारण महत्व आहे. आजच्या या मंगल दिनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सक्रिय सहभाग असलेले महान हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या पराक्रमांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असाच आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्या महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान आहे. त्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील परतूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून झाली होती. मुक्तीसंग्रामात कोलते पिंपळगावकरांचे मोठे योगदान आहे. निजामाच्या अत्याचारातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी पिंपळगावकरांनी रझाकारांविरुध्द 22 जून, 1948 रोजी सशस्त्र लढा दिला होता. तसेच जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले जंगल सत्याग्रह देखील खूपच गाजले होते. मुक्तीसंग्रामासाठी जालना जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देवून हा लढा यशस्वी केला होता. मराठवाड्याची झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील दगडाबाई शेळके यांनीही अनेक ठिकाणी निजाम विरोधी सशस्त्र लढे दिले. या लढ्याचा मुख्य हेतु हा राष्ट्रीयता आणि लोकशाहीची भावना वाढविणे हा होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाच्या जूलमी हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपुर्ण आयुष्याची आहुती देवून मराठवाड्याला निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले असून दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विशेष महिला आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानअंतर्गत ग्राम विकास विभागाच्यावतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्राम पंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांना कामगिरीनूसार प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या वारसांची तसेच जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी यांची पालकमंत्री मुंडे यांनी भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी नागरिकांना शासनाच्या घरपोच सेवा देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘जालना मित्र’ पोर्टलचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी सुचिता सुत्रावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment