जालना
दि.15 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील पोलिस पाटील पद भरती-2025 साठी अर्हता धारक
उमेदवारांकडून विहीत नमुन्यात केवळ ऑनलाईन
पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुकांनी आपले अर्ज https://jalnapp.recruitonline.in
या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
ऑनलाईन
अर्ज करण्यास दि.15 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज
भरण्याची शेवटची तारीख दि.30 सप्टेंबर 2025 अशी आहे. पोलिस पाटील पदासाठी खुला
प्रवर्ग 800 तर मागास प्रवर्गासाठी 600 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. लेखी परीक्षा
दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण,
संबंधित गावचा रहिवासी, वय 25 ते 45 दरम्यान असावे. तसेच जाहिरातीनूसार इतर
कागदपत्रे आवश्यक आहेत. पोलिस पाटील भरती
प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात https://jalnapp.recruitonline.in या संकेतस्थळावर
उपलब्ध असून उ मेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज
करावेत, असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment