Friday, 26 September 2025

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

 


जालना दि.26 (जिमाका) : तहसिल  घनसावंगी  यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांच्या तातडीने निपटारा व्हावा तसेच नागरीकांना जलद न्याय मिळावा या उद्देशाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 महसुल सेवा पंधरवडा अंतर्गत न्याय आपल्या दारी या संकल्पनेतुन रविवार 28 सप्टेंबर  2025 रोजी  सकाळी 11.00 वाजता तहसिलदार तथा तालुका  दंडाधिकारी कार्यालय घनसावंगी येथे लोक अदालत आयोजित केली आहे.

लोक अदालतमध्ये तडजोड होऊ शकणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार मामलदार कोर्ट ॲक्ट ( 15 च्या कलम 143, कुळकायदा दावे अंतर्गत अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये समेट/तडजोड  करायची असल्यास विहीत नमुन्यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्व संबंधीत नागरीक शासकीय कार्यालये यांना याद्वारे सुचित करावे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की, अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये तातडीने न्याय मिळवून घेण्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपात्रांसह वेळेवर उपस्थित राहावे. अशी माहिती तहसिलदार घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment