जालना, दि.23 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना अणि मातोश्री स्किल डेव्हलमेंट सेंटर,जालना यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 सप्टेंबर 2025 मंगळवार रोजी मातोश्री स्किल डेव्हलमेंट सेंटर, अंबड रोड,जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 252 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध होणार आहेत. नमो महारोजगार मेळाव्यानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या मेळाव्यामध्ये निवड झालेल्या निवडक उमेदवारांना नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी बी.के.सी. बांद्रा मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे.
रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 252 रिक्तपदे एसएससी, एचएससी, कोणतेही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर,वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट, अप्रेन्टीस ट्रेनी, अकाउंटंट असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सर्व्हिस अॅडव्हायझर इत्यादी) 18 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांसाठी पदे उपलब्ध झालेली आहेत. आणखी काही पदे उपलब्ध होणार आहेत.तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगाराबाबत अर्थसहाय्य करणा-या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच बरोबर स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अंतर्गत विनामुल्य असलेले विविध रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड,सेवायोजन नोंदणी कार्ड इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रते प्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखाली जालना जिल्हा निवडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा.या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment