.
*ग्राम
पंचायतींना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी
जालना दि. 3 (जिमाका) ग्रामीण
महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असून ती अधिक बळकट
करण्यासाठी राज्यात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात
जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायातीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून ग्राम
पंचायतीस लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी प्राप्त करून द्यावी असे आवाहन
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.
ग्राम
विकास विभागाच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागात
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्राम पंचायती , पंचायत समिती ,
जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोसाहित करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले
आहे.शासनच्या विविध योजनाचा समाजातील सर्व घटकांना लाभ देवून ग्रामीण जनतेचे
आरोग्यमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ उभा करणे ग्रामीण
नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर साधू संत परंपरेचा सहभाग
घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका , सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये
ग्रामपंचायत, पंचायत समिती , व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक
वर्षापासून तालुका, जिल्हा , विभाग व राज्यस्तरावर अशा चार स्तरावर प्रोत्साहन
देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान सुरु केले
आहे. अभियानाचा कालावधी- १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा राहणार आहे. गावाचे
मूल्यमापन करण्यासाठी तालुका ,जिल्हा विभाग व राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली
आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीस स्वंयमुल्यांकन द्वारे अर्ज
सादर करण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी असणार आहे. तालुकास्तरावरील मुल्यमापन
दिनांक ११ जानेवारी ते २६ जानेवारी , जिल्हा स्तरीय मुल्यमापन २८ जानेवारी ते १५
फेब्रुवारी, विभागस्तरीय मूल्यमापन १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी तर राज्यस्तरीय
मूल्यमापन संपूर्ण मार्च महिना दरम्यान होणार आहे.
*मुख्य घटक विषय* सुशासन
युक्त प्रशासन १६ गुण , सक्षम पंचायत १० गुण, जल समृद्ध , स्वच्छ व हरित गाव १९
गुण , मनरेगा व इतर योजनाशी अभिसरण ६ गुण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण १६ गुण
, उपजीविका विकास , सामाजिक न्याय २३, लोक सहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ
निर्माण करणे ५ गुण , तर नाविन्यपूर्ण उपक्रम ५ गुण असे एकत्रित १०० गुणांचे हे
मूल्यमापन असणार आहे. *पुरस्कार /बक्षीस –ग्राम पंचायत* * *तालुकास्तरावर* प्रथम
पुरस्कार रु १५ लक्ष , द्वितीय पुरस्कार रु १२ लक्ष ,तृतीय पुरस्कार रु ८ लक्ष तर
दोन ग्राम पंचायतींना विशेष पुरस्कार प्रत्येकी रु ५ लक्ष रुपयांचा असणार आहे *
*जिल्हास्तरावर* प्रथम पुरस्कार रु ५० लक्ष , द्वितीय पुरस्कार रु ३० लक्ष ,तृतीय
पुरस्कार रु २० लक्ष . * *विभाग स्तरावर* प्रथम पुरस्कार रु १ कोटी , द्वितीय
पुरस्कार रु ८० लक्ष ,तृतीय पुरस्कार रु ६० लक्ष . * *राज्य स्तरावर* प्रथम
पुरस्कार रु ५ कोटी , द्वितीय पुरस्कार रु ३ कोटी ,तृतीय पुरस्कार रु २ कोटी .
पुरस्कार /बक्षीस – पंचायत समिती * *विभाग स्तरावर* प्रथम पुरस्कार रु १ कोटी ,
द्वितीय पुरस्कार रु ७५ लक्ष ,तृतीय पुरस्कार रु ६० लक्ष . *राज्यस्तरावर* प्रथम
पुरस्कार रु २ कोटी , द्वितीय पुरस्कार रु १.५ कोटी ,तृतीय पुरस्कार रु १.२५ कोटी
. पुरस्कार /बक्षीस – जिल्हा परिषद *राज्यस्तरावर* प्रथम पुरस्कार रु ५ कोटी ,
द्वितीय पुरस्कार रु ३ कोटी ,तृतीय पुरस्कार रु २ कोटी . याशिवाय या अभियानाची
जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहीत
करणे व कार्यक्रमाची प्रशिद्धी करणाऱ्या विभागातील एका पत्रकारास पुरस्कार देवून
गौरविण्यात येणार आहे. तसेच अभियानास इन्स्टाग्राम , फेसबुक , यु ट्यूब या अँप वर
व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या ३ चॅनल वरून ( बातम्या देणाऱ्या चॅनल्स वगळता )यांना
राज्यस्तरावरून पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे, मात्र संबधितांनी अभियान
कालावधीत इन्स्टाग्राम , फेसबुक , युट्यूब यांचे एकत्रित यापैकी कोणत्याही एका
माध्यमावर /दोन माध्यमावर / तीन माध्यमावर १० लाख व्हीवज्स असणारे चॅनल पात्र
राहणार आहेत.जे पात्र चॅनलधारक शासनाकडे अर्ज करतील त्यांना पुरस्कार दिले जाणार
आहेत. सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.
एम. व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) उदयसिंग राजपूत नियोजन करत आहेत.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment