जालना दि. 3 (जिमाका) जालना जिल्ह्यात व शहरात
दि.27 ते 6 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दि.6 सप्टेंबर
2025 रोजी गणपती मुर्ती विसर्जनाकरीता मोतिबाग जालना येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
घाणेवाडी तलावातून पिण्याचे पाणी जालना शहरात येते. तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता
2023 चे कलम 163 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मिटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी
प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. सदरील आदेश दि.7 सप्टेंबर 2025 रोजीचे सायंकाळी
6 वाजेपर्यंत लागू राहील, असे आदेश प्र.अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी
केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment