जालना, दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्यामध्ये
अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी (दि.25) रोजी अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगावात अतिवृष्टी झाल्याने सर्व
गाव पुराचे पाणी खाली आले होते, या गावाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधुन त्यांनी
या आसमानी संकटात मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटात
शासन आपल्या पाठीशी असल्याचे आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन बाधीत नागरिकांना
मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी करत आपल्या
समस्या श्री. आठवले यांच्यासमोर मांडल्या असता, त्यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे
झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी
केंद्र सरकारद्वारे राज्याला विशेष
पॅकेज मिळवून देणार असल्याचे आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी,
तलाठी यांच्यासह पिठोरी सिरसगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या
व अडचणी जाणून घेतल्या.

No comments:
Post a Comment