जालना, दि.23(जिमाका): राष्ट्रीय अन्न् सुरक्षा
आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम 2025-26 अंतर्गत बायोचार
निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतातील कापूस पिकांच्या
पऱ्हाट्यांचा वापर करुन जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढवून पिकांची उत्पादकता वाढवणे हा
आहे.
यासाठी वैयक्तिक लाभार्थी नोंदणी राष्ट्रीय
शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था अर्ज करण्यास
पात्र असणार आहेत. याकरीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड
प्रक्रिया प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, पात्र शेतकऱ्यांना
प्रति युनिट रु. 10 हजार रुपये किंवा एकूण खर्चाच्या 50 टक्के पैकी जे कमी असेल त्याप्रमाणे
अनुदान मिळणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकऱ्यांनी
बायोचार युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment