Saturday, 27 September 2025

30 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 519 रिक्त पदांसाठी भरती

 

 

जालना, दि.27 (जिमाका) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि मातोश्री स्किल डेव्हलमेंट सेंटर, अंबड रोड, जालना यांचे संयुक्त विद्यामानाने दिनांक 30 सप्टेंबर, 2025मंगळवार रोजी मातोश्री स्किल डेव्हलमेंट सेंटर, अंबड रोड, जालना येथे सकाळी 10ते दुपारी 4 वाजेपर्यंत" पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात दहावी बारावी/आय.टी.आय/बी.ए./बी.कॉम बी.एस सी./एम. कॉन / डिप्लोमा इंजीनिअर / बी. ई. इंजीनिअर इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन डिप्लोमा व इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक महिला उमेदवारासाठी एकूण 519 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 10 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या रोजगार मेळाव्यामध्ये मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर प्रा.लि. जालना यांची 4 पदे, पेटीएम सेर्विसेस प्रा.लि. जालना यांची 50पदे, आई इन्शुरन्स अँड इन्वेस्टमेंट सेर्विसेस यांची 48 पदे. भारत फाइनेंशियल सेर्विसेस लिमिटेड जालना यांची 66 पदे, टाटा मोटर्स लिमिटेड पुणे (By Quess Crop) यांची 100 पदे, बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती संभाजीनगर (By Quess Crop) यांची 100 पदे, म्हस्के टेक्नोलॉजी प्रा. लि. बदनापूर जालना याची 6 पदे, धूत ट्रान्समिशन प्रा.लि. छ. संभाजीनगर (By Pariveda Advisory) यांची 20 पदे, रेडिको खेतान लिमिटेड छत्रपती संभाजीनगर (By Pariveda Advisory) यांची 20 पदे, युवशक्ती फाऊंडेशन (YSF) छ. संभाजीनगर यांची 105 पदे, अशी एकूण 519 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 10 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्येक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

या सुवर्ण संधीचा रोजगार इच्छुक जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युमे/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी वाजता 9 उपस्थित राहावे, नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप क्रमांक02482-299033 वर संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment