जालना दि. 3 (जिमाका) पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय, जालना यांच्या
विद्यालय सल्लागार समिती तसेच विद्यालय व्यवस्थापन समिती यांची महत्वाची बैठक आज
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या
अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस
खासदार संजय जाधव यांचे प्रतिनिधी मधुकर पाईकराव, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. पाटील, तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पवार, कस्तुरबा
गांधी बालिका विद्यालय परतूर यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती साळवे, पीटीसी सदस्य
विनोद दाभाडे, रेणुका पळसकर तसेच इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.
दोन्ही
बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
राबविण्यात येणारे उपक्रम, तसेच विद्यालयातील पायाभूत सुविधा बळकटीकरण, स्वच्छता,
आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण भोजन यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर
विशेष भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी नीट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय
स्तरावरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अधिक चांगली तयारी करून देण्यासाठी नवोदय
‘लक्ष पोर्टल’चा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. तसेच मुलांच्या
सुरक्षिततेसाठी वसतिगृहाची नियमित देखभाल आणि दुरुसती करण्याच्या सूचनाही त्यांनी
दिल्या. दोन्ही बैठकीदरम्यान मागील
कार्यकाळातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आणि आगामी शैक्षणिक वर्षासाठी ठोस
उपाययोजना आखण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांची
सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्य यावर विशेष भर देण्याबाबतच्या सुचना देण्यात
आल्या.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment