जालना दि.24 (जिमाका) : दि. 3 ऑक्टोबर
हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व
दि. 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2025 हा
कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा
करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहे.
सर्व
शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाव्या अखत्यारीतील राज्यातील
सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग,
आस्थापना व व्यापारी बँक, सर्व शैक्षणिक
संस्था/विद्यापीठे/ महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थामध्युन अभिजात मराठी भाषे संदर्भात जास्तीत जास्त संशोधन,संवर्धन व जनजागृती
व्हावी या हेतूने प्रतिवर्षी दि . 3
ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व
दि. 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा
करण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment