जालना दि.18 (जिमाका) :- स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आरोग्य शिबीराचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्रि रुग्णालय, आणि जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरामध्ये लहान मुले व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तरी शिबीराचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
राष्ट्राच्या अरोग्य दृष्टीकोनात बदल घडविण्यासाठी-संपुर्ण देशभर उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्यात येत आहे. या आरोग्य शिबीरात 20 प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात येणार आहे. आभा कार्डसाठी आधार कार्ड लिंक मोबाईल आवश्यक असल्याने तो सोबत ठेवावा, असेही जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment