जालना दि.18 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना या संपुर्ण ऑनलाईन स्वरुपात कार्यान्वित आहेत. तरी इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर सादर करावेत. इतर बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजना या ऑफलाईन स्वरुपाच्या असून त्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना या जिल्हा कार्यालयाशी दुरध्वनी 02482-223420 वर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment