Thursday, 26 November 2026

हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान दिवस उत्साहात

 


जालना,दि.26 (जिमाका) : हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आज गुरुवार (दि.26) रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. कल्पना त्रिभुवन तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपप्राचार्य तृप्ती भोपे उपस्थित होत्या.

अॅड. कल्पना त्रिभुवन यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेतील संविधानाचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन करून ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य तृप्ती भोपे यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद करून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करणे आणि संविधानाने दिलेल्या मूल्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

संविधानाविषयी जनजागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. के. करंगळे, तर आभार प्रदर्शन बी. पी. टाक यांनी केले. यावेळी संस्थेतील अधिकारी व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment