Thursday, 26 November 2026

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा जालना जिल्हा दौरा

 


जालना, दि. 26 (जिमाका): सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे शुक्रवार (दि.27) रोजी जालना जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

दि. 27 नोव्हेंबर 2026 शुक्रवार रोजी सकाळी 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन करतील.सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथून महिला रुग्णालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता महिला रुग्णालय एमसीएच विंगचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी 11 वाजता एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांचे पदाधिकारी/अधिकारी यांच्याशी जिल्हा परिषदे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधणार आहेत.

 सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री श्री. आबिटकर हे दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील व राखीव. दुपारी 2 वाजता जालना येथून प्रादेशिक मनोरुग्णालय कुंभेफळकडे प्रयाण करतील. दुपारी 2.10 वाजता प्रादेशिक मनोरुग्णालय कुंभेफळ, येथे आगमन व इमारत बांधकामाची पाहणी करतील. दुपारी 2.30 वाजता कुंभेफळ येथून उपजिल्हा रुग्णालय अंबडकडे प्रयाण करतील. दुपारी 3 वाजता उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे आगमन व रुग्णालयाच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण व लाभार्थ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी 4 वाजता अंबड, जि. जालना येथून घनसावंगीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय घनसावंगी येथील नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण व लाभार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सोईनुसार घनसावंगी येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment