Tuesday, 17 November 2026

जनगणना 2027 च्या लोकसंख्या गणनेसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण

 


 

जालना, दि. 17 (जिमाका) : आगामी जनगणना 2027 च्या अनुषंगाने लोकसंख्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी जालना येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. 16 व 17 नोव्हेंबरदरम्यान महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या प्रशिक्षणात जनगणनेच्या कामकाजाचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

जनगणना संचालनालय, मुंबई येथील राज्यस्तरीय प्रशिक्षक सागर बागुल (DDCO) आणि पवन गोडे (SI GR II) यांनी जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यामध्ये लोकसंख्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पीई ॲप, सीएमएमएस मॉड्यूल्स, एसई पोर्टल तसेच उपगणना विभागांच्या सीमा निश्चितीबाबत माहिती देण्यात आली. या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या 29 ते 30 प्रश्नांची माहितीही सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली.

 

जनगणनेचे काम विविध प्रशासकीय स्तरांवर प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन, व्यवस्थापन, अंमलबजावणी व देखरेख यंत्रणा, वेबआधारित प्रणाली आणि विविध स्तरांवरील प्रशिक्षणांचे आयोजन यावरही चर्चा करण्यात आली.

 

या प्रशिक्षणास प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****

 

No comments:

Post a Comment