Thursday, 26 November 2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्जासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 


 

जालना, दि.26(जिमाका): सन 2026-27 करीता राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक शासनस्तरावरुन प्राप्त झाले असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या  कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 12 वी नंतर पदवी व पदवीव्युत्तरसाठी नव्याने प्रवेशित व ओबीसी, व्हिजेएनटी, इडब्ल्यूएस, एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment