जालना,
दि. 27 (जिमाका): राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि मोफत आरोग्य
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर काम करीत आहे. आरोग्य
संवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना, आरोग्य संस्थांमधील अडचणी आणि
सेवांचा आढावा घेत आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान केली जात आहे. जालना जिल्ह्यातील
आरोग्य संस्थांना निधी आणि मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
जालना येथील जिल्हा महिला
रुग्णालयाच्या माता व बाल संगोपन (एमसीएच) विभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास खासदार डॉ. कल्याण काळे, माजी
मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, आरोग्य संचालक
डॉ. विजय कंदेवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.
सईदा अफरोज, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र
पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधीक्षक सुदाम गवारे,
सहायक संचालक (हिवताप) डॉ. रेखा भंडारी, डॉ. पाटोदेकर आदी उपस्थित होते.
आरोग्य संवाद यात्रेतून नागरिकांशी
थेट संवाद साधला जात असून, आरोग्य सेवांबाबत विविध सूचना प्राप्त होत आहेत. या
संवादामुळे आरोग्य यंत्रणेतील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे शक्य होत
आहे. आरोग्य विभागाच्या अनेक इमारतींची कामे पूर्ण झाली असून, या सुविधा पूर्ण
क्षमतेने कार्यान्वित करून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यावर भर दिला जात आहे.
जालना येथील कँथलॅब आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाचे पुढील सहा महिन्यांत उद्घाटन
करण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
महिला
व बाल आरोग्य सेवेला प्राधान्य
महिला आणि बालकांच्या आरोग्य सेवेला
शासन प्राधान्य देत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या
आरोग्य तपासणी व उपचारांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. बालकांमधील
हृदयविकारांसह विविध आजारांचे निदान करून वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यावर भर
दिला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सारंग गावंडे यांच्यावर यशस्वी हृदय
शस्त्रक्रिया करण्यात आली असून, बालकांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा
अधिक सक्षम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली
आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालये,
आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक
प्रयत्न केले जातील. माता व बाल संगोपन केंद्राला ‘राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री
रुग्णालय’ असे नाव देण्याची शिफारस मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे मंत्री
आबिटकर यांनी सांगितले.
शासकीय
रुग्णालयांत मोफत उपचारांची सुविधा
गरिबांसह सर्व नागरिकांनी शासकीय
रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी यावे, अशा दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून
देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र
शासनाच्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होत
आहेत. उपचारासाठी रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आरोग्य
विभाग कार्यरत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्य विषयक समित्या अधिक
कार्यक्षम करण्यात आल्या असून, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य
यंत्रणेच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात आहे. आरोग्य संवाद यात्रेतून आरोग्य
संस्थांमधील सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता
तपासून आवश्यक सुधारणा करण्यात येत असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. आबीटकर यांनी
सांगितले.
जालना
जिल्ह्यात 500 खाटांचे प्रसूती रुग्णालय उभारावे – खासदार डॉ. कल्याण काळे
जालना जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या
विस्तारासाठी सुसज्ज इमारतींसोबत आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे
आहे. सर्वसामान्य नागरिकांनी शासकीय रुग्णालयांना उपचारासाठी प्रथम पसंती द्यावी,
यासाठी आरोग्य सेवांचा दर्जा उंचावला पाहिजे.
-*-*-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment