Monday, 26 January 2026

जालना शहर महानगरपालिकेची विविध कामे व सीना-कुंडलिका नदी स्वच्छता अभियानाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

 







 

               जालना, दि.23 (जिमाका) :  भारतीय प्रजासत्‍ताक दिनानिमित्त राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे आज जालना येथे आल्या असता, त्यांच्या हस्ते जालना शहर महानगरपालिकामार्फत जालना शहरातील विविध कामांचे उद्घाटन करण्‍यात आले. यामध्ये भोकरदन नाका येथे सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जालना शहरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करुन संख्या नियंत्रण करणे व निवारा केंद्रामध्ये ठेवण्यासाठीचे श्वान केंद्र, तसेच छत्रपती संभाजी उद्यान प्रवेशद्वाराचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ  पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पार पडला.

तसेच समस्त महाजन ट्रस्ट अंतर्गत सीना-कुंडलिका नदी पात्राचे पुर्नजिवन व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ  पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पार पडला.  

या प्रसंगी आमदार अर्जून खोतकर, नारायण कुचे, जिल्हाधिकारी अशिमा मित्‍तल मनपाचे अति‍रिक्‍त आयुक्‍त अर्जुन गिराम, मनपा उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड, शहर अभियंता मनपा सय्यद सऊद यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment